

स्टार स्पेशल केअर
IRDAI UIN: SHAHLIP21243V022021
HIGHLIGHTS
Plan Essentials
अद्वितीय पॉलिसी
एक विशेष पॉलिसी जी ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डरचे निदान झालेल्या लोकांसाठी नुकसानभरपाई कवच प्रदान करते.
पॉलिसी घेण्याचे वय
3 ते 25 वर्षे वयोगटातील लोक ज्यांना ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डरचे निदान झाले आहे ते या पॉलिसीचा लाभ घेऊ शकतात.
इन्श्युअर्ड रक्कम
ही पॉलिसी रु. 3,00,000/- इन्श्युअर्ड रक्कम प्रदान करते.
वैद्यकीय तपासणी
या पॉलिसीचा लाभ घेण्यासाठी इन्शुरन्सपूर्व वैद्यकीय तपासणी अनिवार्य नाही. तथापि, मागील सर्व वैद्यकीय नोंदींची प्रत सादर करणे आवश्यक आहे.
Detailed List
काय समाविष्ट आहे ते समजून घ्या
महत्वाचे ठळक मुद्दे
पॉलिसीचा प्रकारही पॉलिसी केवळ वैयक्तिक आधारावर फायदे प्रदान करते. |
पॉलिसी टर्मही पॉलिसी एका वर्षाच्या मुदतीसाठी घेता येते. |
इन-पेशंट हॉस्पिटलायझेशन24 तासांपेक्षा जास्त कालावधीसाठी हॉस्पिटलायझेशनचा खर्च कव्हर केला जातो. |
हॉस्पिटलायझेशननंतरहॉस्पिटलायझेशननंतर 60 दिवसांपर्यंतचा वैद्यकीय खर्च हॉस्पिटलमधून डिस्चार्ज झाल्याच्या तारखेपासून हॉस्पिटलायझेशन खर्चाच्या किंवा वास्तविक खर्चाच्या 7% पर्यंत कव्हर केले जाते. |
रूम भाडेइन-पेशंट हॉस्पिटलायझेशन करताना रुम, बोर्डिंग आणि नर्सिंगचा खर्च दररोज 5,000/- पर्यंत कव्हर केला जातो. |
सामायिक निवासविमाधारक व्यक्तीच्या सामायिक निवासस्थानाचा ताबा घेतल्यावर होणारा खर्च रू. 500/- पर्यंत कव्हर केला जातो जो जास्तीत जास्त रू. 2,000/- प्रति हॉस्पिटलायझेशन आणि रू. 10,000/- प्रति पॉलिसी कालावधीच्या अधीन असतो. |
इर्मजन्सी ॲम्बुलन्सखाजगी ॲम्बुलन्सद्वारे विमाधारक व्यक्तीच्या वाहतुकीसाठी ॲम्बुलन्स शुल्क रू. 750/- प्रति हॉस्पिटलायझेशन आणि रु. 1500/- प्रति पॉलिसी कालावधीपर्यंत कव्हर केले जाते. |
डे केअर प्रक्रियावैद्यकीय उपचार आणि शस्त्रक्रिया ज्यांना तांत्रिक प्रगतीमुळे 24 तासांपेक्षा कमी हॉस्पिटलायझ करण्याची आवश्यकता असते अशा पद्धतींचा समावेश आहे. |
को-पेमेंटही पॉलिसी नवीन तसेच नूतनीकरण पॉलिसींसाठी प्रत्येक क्लेमच्या रकमेच्या 20% को-पेमेंटच्या अधीन आहे. |
आधुनिक उपचाररोबोटिक सर्जरी, ओरल केमोथेरपी इत्यादी आधुनिक उपचारांसाठी केलेला खर्च पॉलिसी क्लॉजमध्ये नमूद केलेल्या मर्यादेपर्यंत देय आहे. |
उप-मर्यादापॉलिसी क्लॉजमध्ये नमूद केल्यानुसार पॉलिसी काही प्रक्रिया आणि उपचारांसाठी उप-मर्यादा अधीन आहे. |
प्रतीक्षा कालावधी
1. आधी असलेल्या रोगांसाठी - 48 महिने
2. विशिष्ट रोग/प्रक्रियांसाठी - 24 महिने
3. प्रारंभिक प्रतीक्षा कालावधी - 30 दिवस (अपघात वगळता)
आधुनिक उपचार
आधुनिक उपचारांच्या कव्हरेजसाठी कृपया येथे क्लिक करा.
नुतनीकरण
वयाच्या 25 वर्षापर्यंत नूतनीकरण. 25 वर्षांच्या पलीकडे विमाधारक व्यक्ती/यांना लागू प्रतीक्षा कालावधीसाठी सातत्य लाभांसह इतर कोणतेही योग्य वैयक्तिक नुकसानभरपाई आधारित हेल्थ इन्शुरन्स उत्पादन दिले जाईल.
नूतनीकरणासाठी वाढीव कालावधी
पॉलिसी संपल्याच्या तारखेपासून 30 दिवस.
फ्री लुक कालावधी
पॉलिसीच्या अटी आणि शर्तींचे पुनरावलोकन करण्यासाठी विमाधारकास पॉलिसी मिळाल्याच्या तारखेपासून 15 दिवसांचा फ्री लुक कालावधी उपलब्ध आहे. जर विमाधारक अटी आणि शर्तींशी समाधानी नसेल तर, विमाधारक पॉलिसी रद्द करण्याची मागणी करू शकतो आणि अशा परिस्थितीत कंपनी संबंधित कालावधीसाठी मुद्रांक शुल्क आणि आनुपातिक जोखीम प्रीमियम समायोजित केल्यानंतर भरलेल्या प्रीमियमच्या परताव्याची परवानगी देऊ शकते, परंतु असे रद्द होईपर्यंत कोणताही क्लेम केला जाऊ शकत नाही.
पॉलिसीच्या नूतनीकरणाच्या वेळी फ्री लूक कालावधी लागू होत नाही.
कव्हर केलेले उपचार
काही प्रक्रिया आणि/किंवा उपचारांवर झालेला खर्च येथे नमूद केलेल्या मर्यादेपर्यंत देय आहे:
| आजार/उपचार | प्रति पॉलिसी कालावधी मर्यादा रु. |
|---|---|
| एडेनो टॉन्सिलेक्टॉमी | प्रति पॉलिसी कालावधी रु.25,000/- |
| सीझरच्या उपचारांसाठी हॉस्पिटलायझेशन | प्रति पॉलिसी कालावधी रु. 30,000/- |
| शस्त्रक्रिया आवश्यक असलेल्या फ्रॅक्चरच्या उपचारांसाठी हॉस्पिटलायझेशन | प्रत्येक पॉलिसी कालावधीसाठी इन्श्युअर्ड रकमेच्या 20% पर्यंत |
| बोटॉक्स इंजेक्शन (केवळ रूग्णालयात दाखल असताना दिले जाते तेव्हा देय) | रु. 5000/- प्रति सिंटिंग कमाल रु. 20,000/- प्रति पॉलिसी कालावधीच्या अधीन |
| बिहेव्हिअर थेरपी, फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी आणि स्पीच थेरपी | प्रति पॉलिसी कालावधी रु. 1,500/- पर्यंत |
दुसरे काहीतरी शोधत आहात?
सर्व प्लॅन्स पहासुरु करूया
सर्वोत्तम बद्दल खात्री बाळगा
तुमचे भविष्य आमच्यासोबत सुरक्षित करा.


तुमची पॉलिसी मिळविण्यासाठी तयार आहात?




